हग्रलेख २. दिनांक ३.११.२०१७ नमस्कार , आज दिनांक ३.११.२०१७ रोजीच्या तुमच्या हग्रलेखात तुम्ही अर्थकारणाचे जाम मोठे मोठे ढाचे दिले आहेत , असं एकाने सांगितलं आणि “ मला काय वाटतं ?” हे विचारलं , त्याकरिता . मुद्दा १. बँकांना दिलेल्या आर्थिक मदतीबद्धल जाम मोठं काहीतरी बोलताय अस भासवलय. त्यात तुम्ही रघुराम राजन यांच्या "बँकांनी बुडीत कर्जाची माहिती जाहीर करण्याचा आग्रह धरला" या एका निर्णयाच कौतुक केलंय. शिवाय तुमच्या मते या अग्रहामुळेच त्यांची फेरनियुक्ती केली गेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. मुद्दा तुम्ही जाम सोयीस्कर मांडला आहे. रघुराम राजन यांची ही मागणी त्यांच्या कार्यकाळाच्या अत्यंत पहिल्या काही दिवसात का केली नाही ? हा मुख्य मुद्दा आहे. मुख्य कारण तेव्हा चिदू भाऊ बसले होते ना त्यांच्या बरोबर. हे नेहमीप्रमाणे तुमच्या अजेंड्यानुसार नमूद केले आहे. असो. महत्वाचा मुद्दा २. तुम्ही बँकांचे रोखे बाजारात विकायला काढण्यासंदर्भात मत वक्तव्य केले आहे. त्याम ध्ये बँका रोखे बाजारात आणणार, आणि ते रोखे सरकारच विकत घेऊन, कसा स्वतः बचाव करू शकतील , आणि हे कसं अनै...