Skip to main content

हग्रलेख १

*गुबेर संपादकीय - लेपळी लोकशाही*
हग्रलेख दिनांक ३०.१०.२०१७

श्री गिरीश गुबेर यांच्या दिनांक ३०.१०.२०१७ मधील "लेपळी लोकशाही" या त्यांच्या हग्रलेखात त्यांनी नेहमीप्रमाणे मुक्ताफळे उधळली आहेत. आता मोदींशीवाय विषय पूर्ण होतच नाही, हे सांगायची गरज नाही. त्यामुळे त्यावादात न पडता खालील फक्त २ मुद्द्यांवर *गु*बेरांनी विचार आणि कृती करावी.


१. तुम्ही म्हणता निश्चलीकरणाच्या निर्णयावर मतदान घ्या आणि भाजप वाल्यांना स्वतःचे मत देण्याची मुभा द्या. वगैरे वगैरे... एक काम करा तुमच्या लोकसत्ता समूहातल्याच, तुमच्या अगदी जवळच्या लोकांना 

*"तुम्ही पूर्वी अग्रलेख मागे घेतल्यामुळे सम्पादकीय पदावर राहण्याची लायकीचे राहिला आहात का?"* यावर मतदान करायला लावा. अर्थात तसं तुम्ही करणार नाही, कारण निर्भीड पार्श्वभागातून शाईचे बुडबुडे येतील लगेच तुमच्या.


२. आणखी काय तर म्हणे "नेता पाच वर्षातून एकदा निवडून दिला जातो. उमेदवार कोण हे ठरवण्याचा अधिकारही नसतो. पक्ष नेते लादतात..." वगैरे,वगैरे. *गु*बेर साहेब, हे किमान फुकट तरी असत. आता आम्ही रोजचे ४ रुपये देऊन वृत्त पत्र घेतो (मी नाही, इतर) , त्यात ६०% हुन अधिक जाहिराती, उरलेल्या ४०% मधे तुमचा हग्रलेख, एवढं सगळं आम्ही सहन करतोच की. 


बर तुम्ही एक पायंडा पाडा, *प्रत्येक वर्षाचा लोकसत्ताचा खप आणि सम्पादकीय पदाची नियुक्ती* याची एकदा सांगड घालून टाकायला सांगा तुमच्या वरिष्ठांना. पण तस तुम्ही करणार नाही, कारण तस केलं तर पहिल्याच वर्षी पुन्हा निर्भीड पार्श्वभागातून शाईचे बुडबुडे येतील आणि केतकरांसारख भिखा मागत फिरावं लागेल याची भीती.

असो, बाकी अनेक मुद्दे आहेत, पण आज पुरत एवढंच.



Comments