हग्रलेख
२.
दिनांक ३.११.२०१७
नमस्कार,
आज दिनांक ३.११.२०१७
रोजीच्या तुमच्या हग्रलेखात तुम्ही अर्थकारणाचे जाम मोठे मोठे ढाचे दिले आहेत, असं एकाने सांगितलं आणि “मला काय वाटतं?” हे विचारलं , त्याकरिता.
मुद्दा
१. बँकांना दिलेल्या आर्थिक मदतीबद्धल जाम मोठं काहीतरी बोलताय अस
भासवलय. त्यात तुम्ही रघुराम राजन यांच्या "बँकांनी बुडीत कर्जाची माहिती
जाहीर करण्याचा आग्रह धरला" या एका निर्णयाच कौतुक केलंय. शिवाय तुमच्या मते
या अग्रहामुळेच त्यांची फेरनियुक्ती केली गेली
नाही असं तुमचं म्हणणं आहे. मुद्दा तुम्ही जाम सोयीस्कर मांडला
आहे. रघुराम राजन यांची ही मागणी त्यांच्या कार्यकाळाच्या अत्यंत पहिल्या काही
दिवसात का केली नाही? हा मुख्य मुद्दा आहे. मुख्य कारण तेव्हा चिदू भाऊ
बसले होते ना त्यांच्या बरोबर. हे
नेहमीप्रमाणे तुमच्या अजेंड्यानुसार नमूद केले आहे. असो.
महत्वाचा
मुद्दा २. तुम्ही बँकांचे रोखे बाजारात विकायला काढण्यासंदर्भात मत वक्तव्य केले आहे. त्यामध्ये बँका रोखे
बाजारात आणणार, आणि ते रोखे सरकारच विकत घेऊन, कसा
स्वतः बचाव करू शकतील, आणि हे कसं अनैतिक वगैरे अस लिहिलय. सामान्य
वाचकाला समजावं म्हणून मी थोडं वेगळ्या आणि सोप्प्या उदाहरणासहीत मांडतो. कदाचित वाचकांना लगेच
समजेल.
त्याच कसय, आता लोकसत्ता स्वतःच्याच पेपर मधे स्वतःचीच स्तुती करणारी जाहिरात देतं.
त्यात ९९% वेळा तर जाहिरात सम्पादकीय कसं चांगलं यासाठी असते. आता यामागचं
अर्थकारण समजून घ्या. स्वतःच्याच पेपरच्या अत्यंत प्राईम लोकेशनवर / महत्वाच्या पानावर ही जाहिरात
दिली जाते. (ज्याचा रेट काही हजार रुपये प्रति चौ. सेंटीमीटर असतो. म्हणजे एक
चतुर्थांश पानाची जाहिरात काही लाखांच्या घरात सहज जाते, शिवाय ती रंगीत असेल तर
अधिकच खर्च)
आता
बघा हं. या जाहिरातीचा मुख्य उद्देश काय? तर आपले वाचक वाढविणे, अथवा आपल्याच
वाचकांना, “संपादकीय कसे चांगले आहे” हे सांगण्यासाठी प्रयत्न करणे आहे. यातून
अपेक्षित काय? तर वाचकांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगाव की हे वर्तमानपत्र विकत घ्या,
संपादकीय चांगल असत.... अरे बापरे.... हे तर अतीच होतय ...
आता
मला सांगा स्वतःच्या पेपर मध्ये काही लाखोंची जागा “फक्त संपादकीय कसे चांगले” हे
दाखविण्यासाठी खर्च करणे कुठल्या नैतिकतेमध्ये बसते? (हो कारण इथे दुसरी कोणती
जाहिरात छापली असती तर तेवढे पैसे पेपरला / एक्स्प्रेस समूहाला मिळालेच असते, जे
नफ्यामध्ये गेले असते आणि समूहाच्या इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढीत वळते झाले असते)
जर अशा जाहिराती देऊनही वर्तमानपत्राचा खप कमी होत असेल तर त्याची नैतिक जबादारी कोणी
घ्यायची? J
तर
अस आहे सगळ. आपण महान थोर विचारवंत असलही, पण काही क्लिष्ट विषय असे उदाहरणासहीत
लिहिले तर तुमच्या वाचकांना समजायला फार सोप्प जाईल. संपादकीय साहेब, वाचक हुशार
असतात. तुमचे मालकही हुशार आहेत. स्वतःच्या
हग्रलेखासाठी कंपनीचा (एक्स्प्रेस समूहाचा) जेवढा खर्च करताय, त्याचा हिशोब
द्यावाच लागेल कधीना कधी. विचार करून निष्पक्ष पत्रकारिता करायचा प्रयत्न करा, नाही
तर शाबासकी झाकोळून जाण्याचा धोका संभवतो.
This idea of financing thru bonds was used by earlier govt too. This was overlooked conveniently.
ReplyDelete